हसरी एक उनाड ती संध्याकाळ होती,
आपुल्या या प्रेमाची साक्ष आभाळ देती.
ऐलतीरी मी उभा तू पैलतीरी उभी होती,
वाहत्या पाण्यात दिसे गोड छबी किती,
नदी काठास भेटता स्वरात गीत गाती,
आपुल्या या प्रेमाची साक्ष आभाळ होती.
भेटता येऊनी तुला पार करुनी तिर,
हर्ष आनंदे येतो दोघांचा भरुनी उर,
शब्द मुखात अडले अश्रू पूर बनती,
आपुल्या या प्रेमाची साक्ष आभाळ होती.
सूर्य अस्ता जाता नदीस येऊनी बिलगतो,
निळ्या पाण्या रंग तांबडा देऊनी जातो,
सूर्य समीप येता वाटे मिलनाची भीती,
आपुल्या या प्रेमाची साक्ष आभाळ होती.
हातात घेता हात काठ नदीचा सजला,
नदी काठी स्वप्नांचा उभा राहीला इमला,
श्वासास भेटे श्वास विझती दिव्याच्या वाती
आपुल्या या प्रेमाची साक्ष आभाळ होती.
(दिपी)
©दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६