गंध फुलांचे चौफेर
पारिजात फुललेले
रूप मोतीचे घेऊन
दवबिंदू सजलेले
चिवचिव पानाआड
खळखळ वाहे झरा
साज हिरव्या रंगाचा
नववधू परी धरा
होते रिमझिम कोठे
खेळ ऊन सावलीचा
मिलनास सागराच्या
वेग वाढला नदीचा
रंग सावळा मेघाचा
कृष्ण भासतो राधेचा
गंध उतरे श्वासात
दरवळणाऱ्या फुलांचा
*पूनम सूलाने*
*हैदराबाद*