आनंदीबाई रावराणे महाविद्यालय व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर सहा महाविद्यालये यांचा एकत्रितपणे उपक्रम
वैभववाडी
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर कट्टा” या उपक्रमाची विद्यार्थ्यांना माहिती देण्याच्या उद्देशाने “जागर करिअर कट्टा” हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी शनिवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आणि भारतीय प्रशासकीय सेवेच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुणे, दिल्ली या ठिकाणी वेगळ्या सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून युवक शहरी भागांमध्ये येतो तो थांबवणे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी करावा लागणारा खर्च सामान्यांच्या आवाक्यात यावा, यासाठी ‘आयएएस आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत दिल्ली-मुंबई अथवा संपूर्ण भारतामध्ये कार्यरत असणारे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ऑनलाइन मार्गदर्शन दररोज एक तास याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वेगवेगळे अनुभव विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन तर देतातच पण त्याच बरोबर युवकांचा प्रशासकीय सेवेमध्ये येण्याचा दृष्टिकोन बदलण्यामध्ये देखील मदत होत आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक “यशवंत शितोळे” यांनी केले.
आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडीचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये म्हणाले की, एमपीएससी व यूपीएससीच्या माध्यमातून उज्वल भवितव्याची स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्याने “करिअर कट्टा” या उपक्रमाशी जोडली जाणे अत्यंत गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ चे प्राचार्य डॉ. एस. डी. डिसले व विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय तळेरे चे प्राचार्य श्री श्रीपाद वेलिंग यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर वेबिनार मध्ये खालील महाविद्यालये त्यांचे विद्यार्थी, प्राचार्य व समन्वयक यांचा समावेश होता. १) संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, समन्वयक प्रा.बी. ए. चव्हाण. २) श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगड, प्राचार्या डॉ. सौ. सुखदा जांभळे, समन्वयक प्रा. प्रल्हाद कांबळे ३) एस. पी. के. महाविद्यालय सावंतवाडी, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, समन्वयक डॉ. एस. एम. बुवा ४) आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालय दोडामार्ग, प्राचार्य एम.व्ही. गोळसे, समन्वयक प्रा. एम. डी. पाताडे. ५) अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी सांगुळवाडी, प्राचार्य डॉ. सचिन चंदावरकर, समन्वयक प्रा. जावेद देवळेकर. ६) विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय तळेरे, समन्वयक प्रा. जी. बी. हनवते. ७) आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी, जिल्हासमन्वयक डॉ. अजित दिघे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी झूम ॲप व यूट्यूब द्वारे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.