You are currently viewing १७ सप्टेंबर पर्यंत संयम; त्यानंतर  राजकीय संघर्ष

१७ सप्टेंबर पर्यंत संयम; त्यानंतर राजकीय संघर्ष

माजी राज्यमंत्री दीपक केसरकर

माझा राजकीय संघर्ष रक्तरंजित नव्हता, मतपेटीतून दाखवून दिले. आता १७ सप्टेंबर पर्यंत शांत राहणार, तोपर्यंत कोणतेही वक्तव्य करणार नाही. संयम राखेन, त्यानंतर मात्र माझा व्यक्तिगत संघर्ष असेल असा इशारा माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिला.
यात्रा लोकांच्या समृद्धीसाठी हवी, भडकाऊ भाषण करून अशांतता निर्माण करून हे योग्य नाही. ती आपली कोकणची संस्कृती नाही. आपलं वय झाल्यावर इतर आयुष्यातील वर्ष लोकांच्या सेवेसाठी खर्च केली पाहिजेत. आपल्या नेत्याला पद मिळाले की कार्यकर्त्यांचा उत्साह समजू शकतो. पण सिंधुदुर्ग जिल्हा रेडझोन मध्ये आहे. याचे भान ठेवायला हवं.
अनेक वर्षापासून आपण राजकीय लढा दिला. त्यामुळे सिंधुदुर्गात शांतता आली. म्हणून जनतेने मतपेटीतून उत्तर दिलं होतं. आता पुन्हा अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास आपण पुन्हा व्यक्तिशः राजकीय संघर्ष करणार,१७ सप्टेंबर पर्यंत संयम पाळीन, असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा