ओरोस :
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ड्युटीतून मूक्त करावे आणि शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी शिक्षक भारती संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 23 ऑगस्ट पासून साखळी उपोषण सुरू केले आहे.
15 ऑगस्ट लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते त्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी निवेदन देण्यात आल्यावर योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते मात्र अद्याप पर्यंत योग्य तो निर्णय घेण्यात आल्या नसल्याने शिक्षक भारती संघटनेने आता साखळी उपोषण सुरू केले आहे.
शिक्षक भारतीय संघटनेचे अध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचा पाचवा दिवस असून शिक्षक भारतीय संघटनेचे मालवण तालुका प्रतिनिधी शुक्रवारी आंदोलनात सहभागी झाले होते.