You are currently viewing माझ्या खात्‍याने कोकणात उद्योग वाढले तर मोठं समाधान – नारायण राणे

माझ्या खात्‍याने कोकणात उद्योग वाढले तर मोठं समाधान – नारायण राणे

खारेपाटण

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या माध्यमातून कोकणात उद्योगाचं जाळं निर्माण झालं. इथे उद्योगच नव्हे तर रोजगार देणारे उद्योजक तयार झाले तर मला मोठं समाधान मिळेल. माझं मत्रीपद सार्थकी लागेल असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथे केले.
जन आशीर्वाद यात्रा सायंकाळी साडे सात वाजता खारेपाटण येथे दाखल झाली. या यात्रेचे भव्य स्वागत खारेपाटणनगरीत करण्यात आले. कोण आला रे कोण आला कोकणचा वाघ आला अशा घोषणांनी परिसर निनादला. तर ढोलताशे, लेझीम पथक आणि फटाक्‍यांची आतषबाजीने परिसर गजबजून गेला होता. खारेपाटणमध्ये आल्‍यानंतर त्‍यांचे खारेपाटण येथील विभागीय अध्यक्ष, बुथ अध्यक्ष, सर्व सरपंच, उपसरपंच, व्यापारी असोसिएशन, उद्योजक संघटना, रिक्षा संघटना, महिला बचतगट संघटना, काझीवाडी मुस्लीम मोहल्ला, जैन समाज, खारेपाटण तालुका निर्मिती समिती आदींतर्फे स्वागत करण्यात आले.

केंद्रीय मंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. कोकणच्या सुपूत्राला त्यांनी महत्वाचं खाते देऊन माझा आणि कोकणचाही गौरव केलाय. माझ्या आयुष्याचे परीवर्तन कोकणी माणसांनी केलं आहे. आता स्थानिकांनी उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्यावा. याखेरीज बाहेरील उद्योजकही इथे येणार आहेत. त्यांनाही सिंधुदुर्गवासीयांनी सहकार्य करावं असे आवाहन श्री.राणे यांनी केले.

राणे यांच्यासोबत आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार आशिष शेलार यांच्यासह भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली, यात्रा संयोजक प्रमोद जठार यांच्यासह भाजपचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा