You are currently viewing माती

माती

माती

हे राष्ट्र बंधुभावाचे
हे राष्ट्र भरत प्रेमाचे
रामाच्या पादुकांनी
पावन सिंहासनाचे ।।

हे राष्ट्र प्रेमिकांचे
हे राष्ट्र देवतांचे
जागोजागी बांधलेल्या
पुरातन मंदिरांचे।

हे राष्ट्र दानवीरांचे
हे राष्ट्र विनोबांचे
दान सर्व केलेल्या
भूदान चळवळीचे।

हे राष्ट्र शूरवीरांचे
हे राष्ट्र सावरकरांचे
देशासाठी सोसले ज्यांनी
हाल काळ्या पाण्याचे।

हे राष्ट्र स्वाभिमानाचे
हे राष्ट्र  टिळकांचे
देशासाठी चालवलेल्या
जहाल वृत्तपत्र केसरीचे।

हे राष्ट्र अध्यात्माचे
हे राष्ट्र ज्ञानोबा माऊलीचे
साऱ्या जगासाठी त्यांनी
मागितलेल्या पसायदानाचे।

हे राष्ट्र बलिदानाचे
हे राष्ट्र चाफेकर बंधूंचे
हसत हसतच सोसलेल्या
फासावरील स्मृतीचे।

हे राष्ट्र ना ते राहिले
घातले सर्व मातीत
मातीत गाडणार आम्हा
हे खेळ राजकारणाचे।

सुचिता कुलकर्णी
मीरा रोड
२२-५-२०१८

प्रतिक्रिया व्यक्त करा