You are currently viewing तुझेच आहे सारे देवा ….

तुझेच आहे सारे देवा ….

जागतिक “सा क व्य” मंचच्या सदस्या कवयित्री प्रा.सुमती पवार यांचे काव्य

तुझेच आहे सारे देवा अनेक नावे तुला
तुझ्या कृपेने जग चालते ठाऊक आहे मला
निर्मिक म्हणती कुणी तुला रे आहे तुझी सत्ता
शक्ती आहे सर्व मान्य रे नको बघ गुंता ….

 

फुले पाखरे गुरे वासरे चंद्र सूर्य तारे
तुझ्या कृपेने बघ वाहती झुळूझुळू वारे
चराचरातून वास तुझा रे डोंगर दऱ्या नि नद्या
कडेकपारी पहा कोसळे धबधबा तो दुध्या ..

 

शुभ्र धुक्यातून कधी प्रकटतो चंद्रमा तो नभी
खळाळून तो पहा गर्जतो तुफानतो उदधी
सूर्याची ती उर्जा आहे चराचरी जीवन
तुझ्या वाचूनी करूच शकतो सांग असा कोण?

 

घराघरांवर कोसळते ते धुके मनोहर किती
कडेकपारी कोसळती ते प्रपात ओसांडती
तरूवेलींना बहर येतो फुलवंती होती
फळे मधुर ती किती तू देतो नसे मोज ना मिती…

 

चमत्कार वाटतो रे सारा विविधता ही किती
पक्षी प्राणी मुले माणसे नाही पहा गणती
तुला भजावे तुला पुजावे तू आकळत नाही
सारे देती संकटकाळी तुझीच बघ ग्वाही…

 

ठाई ठाई दिसती पहा ना तुझे चमत्कार
कुणीच नाही कुणासारखे किती तुझे आकार
गुढ किती तू उकलत नाही पहा तुझे कोडे
एक परंतु आहे खरे रे …
चालते, तुझ्यामुळे … गाडे….

 

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २३ ॲागस्ट २०२१

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 8 =