बांदा
द विजिष अकॅडमी वैभववाडी यांच्या वतीने कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासात खंड पडू नये म्हणून शालेय जीवनातील महत्त्वाची असणारी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेसाठीच्या मुलांना मोफत ऑनलाइन मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मार्गदर्शन वर्ग दिनांक २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी इयत्ता पाचवीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन अकॅडमी च्या वतीने करण्यात येत आहे.
या मार्गदर्शन वर्गाला द विजिष अकॅडमीच्या संचालिका सौ.शितल पाटील मॅडम ( एम.ए.डी.एड) या स्वतः दररोज एक तास ऑनलाइन स्वरूपात मार्गदर्शन करणार आहेत. सातत्याने गेले पाच वर्ष सौ. शितल पाटील मॅडम या विजिष अकॅडमीच्या माध्यमातून शालेय स्पर्धा परीक्षा वर्गांना मार्गदर्शन करत आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांच्या अकॅडमी तून इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीसाठी १६ विद्यार्थी, नवोदय विद्यालय साठी १४ विद्यार्थी, आणि इतर शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये १४ विद्यार्थी यांची निवड झाली आहे. उपयुक्त दर्जेदार मार्गदर्शन, सातत्य आणि ज्यादा प्रश्नपत्रिकांचा सराव या त्रिसूत्रीच्या आधारे त्यांनी आजपर्यंत यश मिळवले आहे. विशेषता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा विशेष लाभ झाला आहे. या पंधरा दिवसाच्या मार्गदर्शन वर्गात विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना स्पष्टीकरण, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, अभ्यास विशेष पद्धतीने कसा करावा, तसेच जलद गतीने प्रश्न कसे सोडवावेत याबद्दल मार्गदर्शन होणार आहे. तरी ज्या पाचवी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनाची आवश्यकता आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना घरात बसूनच शिकण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तरी अशा सर्व विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेण्यासाठी सौ. शितल पाटील मॅडम,
द विजीष अकॅडमी, वैभववाडी. (९७६६६७०७०६ ) यांच्याशी संपर्क करावा.