You are currently viewing मोठी कारवाई : अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक करण्यात NIA ला यश

मोठी कारवाई : अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक करण्यात NIA ला यश

दिल्ली :

अल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांच्या अटकेबाबत एनआयएने एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, ‘तपासणी दरम्यान असे उघडकीस आले आहे की मॉड्यूल सक्रियपणे निधी गोळा करीत होता आणि काही दहशतवादी हे शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी नवी दिल्लीत येणार होते. दरम्यान, देशाच्या विविध भागात संभाव्य दहशतवादी हल्ल्यापूर्वी या सर्वांना अटक करण्याता आली आहे.

अल-कायदा या दहशतवादी संघटनेचे भारतातील जाळे उद्ध्वस्त करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून NIA मोठी कारवाई करण्यात आली आहे. देशातील विविध राज्यात अल-कायदाचं जाळं असल्याची माहिती मिळताच अशा भागात धाड टाकण्यात आली. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्नाकुलमध्ये छापेमारी करत अल-कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. मोठा घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता असे समजले.

बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दहशतवाद्यांना चकमकीनंतर अटक करण्यात आल्याने हे मोठं यश मानलं गेलं. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील धौला कुआं रिंग रोड परिसरात ISIS च्या एका दहशतवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं. चौकशीदरम्यान या दहशतवाद्याने धक्कादायक माहिती दिली होती. दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर होत असलेल्या ठिकाणी घातपात करण्याचा मोठा डाव असल्याची माहिती समोर आली होती. अबू युसूफ असं या दहशतवाद्याचं नाव असून दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात IED स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला होता. अबू युसूफने राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा मोठा डाव असल्याचं सांगितलं आहे. तसेच तो अफगाणिस्तानमधील काही साथीदारांच्या संपर्कातही होता. या दोन ठिकाणी मोठे हल्ले घडवून आणण्याचा डाव असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा