You are currently viewing कलमठ सरपंच पदी शिवसेनेच्या धनश्री मेस्त्री विजयी

कलमठ सरपंच पदी शिवसेनेच्या धनश्री मेस्त्री विजयी

भाजपाला कलमठ मध्ये धक्का :समसमान मतदान झाल्याने चिठ्ठी टाकून झाली निवड

कणकवली

कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायत च्या सरपंच पदी अखेर शिवसेनेच्या धनश्री मेस्त्री यांची निवड झाली आहे. या सरपंच पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. भाजपाच्या वतीने सुहासिनी कांबळी तर शिवसेनेच्या वतीने धनश्री मेस्त्री यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. कलमठ च्या माजी सरपंच देविका गुरव या यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. गेले काही दिवस या पदावर प्रभारी सरपंच म्हणून शिवसेनेच्या उपसरपंच वैदेही गुडेकर यांनी काम केले होते.

या ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे दहा तर शिवसेनेचे सहा सदस्य होते. मात्र भाजपाचे काही सदस्य शिवसेनेच्या बाजूने सरपंच निवडीत राहिल्याचे चित्र दिसून आले. आज झालेल्या निवडणुकीत दोन्ही बाजूने समसमान सदस्यसंख्या झाल्याने चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली. यात धनश्री मेस्त्री यांची सरपंच पदी निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा एक प्रकारे कलमठ मध्ये भाजपला धक्का मानला जात आहे. या निवडीबद्दल शिवसेनेतून जोरदार जल्लोष करण्यात येत असून, सरपंच निवडीसाठी युवासेना समन्वयक तथा ग्रामपंचायत सदस्य राजू राठोड, शिवसेनेचे कार्यकर्ते रामदास विखाळे यांची रणनीती या निवडी प्रसंगी यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने सरपंच निवडीत भाजपाला धोबीपछाड दिल्याचेही बोलले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा