सावंतवाडी :
सावंतवाडी तालुका मराठा समाजाची बैठक शनिवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गाव निहाय छापील निवेदनांचे वाटप करण्यात येणार आहे.
तालुक्यातून २५०००सह्यांचे निवेदन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.त्यादृष्टीने सकल मराठा समाज नियोजन करत आहे. तरी प्रत्येक गावातील मराठा समाज बांधवांनी आपल्या गावाची जबाबदारी घेऊन जास्तीत जास्त सह्या जमवायचे आहेत. आपल्या मुलांच्या पुढील भवितव्यासाठी शैक्षणिक व नोकरी आरक्षण गरजेचे आहे व हे आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी दबावतंत्र व संघर्षाचा वापर करावा लागणार आहे. तरी सर्व मराठा समाज बांधवांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सावंतवाडी तालुका मराठा समाजाची एकजूट दाखवावी असे आवाहन मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक सचिव आकाश मिसाळ यांनी केले आहे.