मन माझे
मन लावणे,
अन
मन जडणे…
दोन्ही मनावरचं अवलंबून.
तरी सुद्धा लोक,
मनाच्या मागे का धावतात?
आशेच्या उंच झोपाळ्यावर,
झोका देत मनाला,
वेडंपीस करतात…
बेभान सुटलेल्या वाऱ्याच्या,
तालावर मनाला..
बेधुंद नाचवतात…
मन असतं निर्मळ,
भावनेत गुंतून जातं.
भावनेच्या भरात,
तोल ढाळून बसतं.
भानावर येताच मन,
स्वतःचीच चूक शोधतं.
स्वतःलाच दोष देत,
आतुष्यभर कुढत बसतं.
तरी पण लोक…
मनाच्या,
मागे का धावतात????
(दीपी)
दीपक पटेकर.
८४४६७४३१९६