You are currently viewing बंध सुरक्षेचे… विश्वासाचे!!

बंध सुरक्षेचे… विश्वासाचे!!

भाजपा कुडाळ शहर महिला मोर्चातर्फे पोलिस कर्मचारी आणि भाजपा कार्यकर्त्यांना रक्षाबंधन!

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या कुडाळ शहराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पोलिसांना आणि भाजपा कार्यकर्त्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले गेले. समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलीस नेहमीच यशस्वीपणे पार पाडत असतात. गेली दोन वर्षे कोरोनाशी लढा देताना पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना जीवन-मरणाशी झुंज द्यावी लागली. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेच्या कर्तव्याबाबत पोलीस दलाचे आभार व्यक्त करण्यासाठी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम भाजपाने केला असल्याची माहिती कुडाळ महिला शहराध्यक्षा सौ मृण्मयी उर्फ ममता चेतन धुरी यांनी दिली.

या कार्यक्रमाला भाजपा कुडाळ शहर अध्यक्षा सौ ममता धुरी यांच्यासमवेत भाजपा ओबीसी सेल महिला जिल्हाध्यक्षा सौ दिपलक्ष्मी पडते, कुडाळ नगरसेविका सौ उषाताई आठल्ये, जिल्हा पदाधिकारी सौ अदिती अनिल सावंत, मुक्ती परब, विशाखा कुलकर्णी, प्राची आठल्ये, रेवती राणे, ग्रीष्मा कुंभार, अक्षता कुडाळकर आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां उपस्थित होत्या. कुडाळचे पोलीस निरीक्षक श्री शंकर कोरे यांच्यासह अन्य पोलिसांना राखी बांधत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासोबतच भारतीय जनता पार्टीच्या सहकारी कार्यकर्त्यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम कुडाळ भाजपा कार्यालयात करण्यात आला. एकसंघ अतूट भाजपा परिवार म्हणून दरवर्षी या कार्यक्रम साजरा केला जातो. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री दत्ता सामंत, जिल्हा परिषद सदस्य, गटनेते तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री रणजीत देसाई, तालुकाध्यक्ष विनायक राणे, शहराध्यक्ष राकेश कांदे, प्रशांत राणे, राकेश नेमळेकर, सोशल मीडिया युवा मोर्चा अध्यक्ष राजवीर पाटील, चिटणीस राजेश पडते, नागेश नेमळेकर यांसह बहुसंख्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा