You are currently viewing सातार्डा-गोवा बॉर्डर वर जुगाराची मैफिल

सातार्डा-गोवा बॉर्डर वर जुगाराची मैफिल

जिल्ह्यात कोविड रुग्ण वाढीस मिळते मदत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातार्डा हे गाव गोवा बॉर्डरवर पेडणे तालुक्याला लागून आहे. सातार्डा व पेडणे येथील लोकांची कामानिमित्त दोन्हीकडे ये जा असतो. परंतु कोरोनाच्या काळात दोन्ही राज्य सीमा बंद असल्याने जाणे येणे बंद केले होते. सातार्डा गोवा बॉर्डरवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व गोवा राज्यातील लोकांची जुगाराची मोठी मैफिल बसते. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून राज्यांच्या सीमा बंद असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांची जुगारासाठी मात्र येथे गर्दी जमते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश जुगारी या बैठकीला हजेरी लावतात. त्यामुळे जुगाराच्या मैफिलीत बरीच गर्दी होते. जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर भेटत आहेत. अशाप्रकारे जिल्ह्याच्या बॉर्डरवर खुलेआम सुरू असणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यांमुळे रुग्णसंख्या वाढ होत आहे. महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश करायचा असल्यास दोन लसींचे डोस पूर्ण झालेत का याची तपासणी करतात मात्र जुगार अड्डयांवर जुगाऱ्याना विनासायास प्रवेश मिळतो.
रात्रभर रंगणाऱ्या जुगाराच्या मैफिलींमध्ये अनेकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्रभर जुगाराच्या मैफिलीत रंगलेली पात्रे सकाळी सिंधुदुर्गात परतताना मात्र कोविडचे संकट घेऊनच येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाठीवर असणारे पोलीस आपली पोळी भाजून घेत गप्प बसतात, परंतु जिल्ह्यात, तालुक्यात मात्र कोरोना अजूनही आटोक्यात येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत जुगाऱ्यांच्या या कृतीवर कारवाई करावी, अन्यथा जिल्ह्याचे कोविड संकट कमी होण्यापेक्षा जिल्हा तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करेल यात शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा