कासार्डे :
कोरोनाचा वाढता प्रसार पहाता कणकवली तालुक्यात उच्चांक संख्या सध्या दिसत आहे.याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी रोखण्यासाठी कासार्डे व्यापारी संघटनेने जनता कर्फ्युच हाक दिली असून रविवार दि. 20 सप्टेंबर ते रविवार दि.27 सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी सायं हाॅटेल विजया येथे झालेल्या बैठकीत एकमुखी निर्णय घेण्यात आला.
कणकवली,तळेरे, खारेपाटण बाजारपेठ बंद ठेवण्यात घोषणा केल्यानतंर कासार्डे बाजारपेठ संघटनेने बंदला साथ देत त्याच निर्णयाची पुनरावृत्ती करत कासार्डे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यावेळी सर्व व्यापारी बंधुंनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये मेडिकल व डाॅक्टर वगळण्यात आले आहे.या बैठकीला अध्यक्ष श्रीपत पाताडे,सचिव श्री. संजय नकाशे,पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर, रविंद्र पाताडे,गणेश पाताडे,दिगंबर केसरकर,राजू वळंजू,पिंटू भांबुरे,राजू पाताडे,बाळा राणे,इम्राइन चोचे,किरण कूपटे, बाजारपेठतील सर्व व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.