You are currently viewing गणेशोत्सवाकरिता ‘मोदी एक्सप्रेस ट्रेन’ ७ सप्टेंबर रोजी होणार रवाना

गणेशोत्सवाकरिता ‘मोदी एक्सप्रेस ट्रेन’ ७ सप्टेंबर रोजी होणार रवाना

 

चाकरमान्यांना गणेशउत्सवाला कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी भाजपा आमदार नितेश राणे श्री.गणेश स्पेशल “मोदी एक्सप्रेस ट्रेन”सोडली जाणार असल्याची घोषणा आज केली. पूर्णतः मोफत असलेली ही ट्रेन मुंबई हुन सिंधुदुर्गात सावंतवाडी पर्यंत चाकरमान्यांना घेऊन ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वेस्टेशन वरील फलाट क्रमांक ८ वरून सुटणार आहे. यात एक वेळचे जेवण सुद्धा मोफत दिले जाणार आहे. अशी माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली.

भाजपा आमदार नितेश राणे हे दरवर्षी गणेशभक्त चाकरमान्यांसाठी कोकणात जाण्यासाठी शेकडो बसेस सोडतात. यावर्षी मात्र त्यांनी थेट रेल्वेची विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावला आहे.या बाबतची घोषणा करतांना आमदार नितेश राणे म्हणाले, केंद्रीय मंत्रीमंडळात नामदार नारायण राणे यांना केंद्रीय लघु, सूक्षम व मध्यम उद्योग मंत्रिपद देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोकणी जनतेवरील आपले प्रेम व्यक्त केले आहे.त्यांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा हा उद्देश येथील चाकरमान्यांना फायदेशीर ठरणार आहे.

गणेशोत्सव आणि चाकरमानी हे नाते दृढ आहे.कोकणी माणूस कोठेही असला,कितीही कामात असला,कोणत्याही मोठ्या हुद्यावर नोकरीस असला तरी गणपतीला आपल्या गावी जातोच,तर कोरोना काळात अडचणीत असलेलाही चाकरमानी यावर्षी गावी जाणार आहे. त्या सर्वच चाकरमानी मंडळींना गावी जाण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून ही पूर्णतः मोफत ट्रेन सोडली जाणार आहे.

२७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत याचे बुकिंग केले जाणार आहे.त्यासाठी कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा चे देवगड मंडळ अध्यक्ष संतोष किंजवडेकर+919421264345,
डॉ.अमोल तेली, +917620947676,
वैभववाडी अध्यक्ष नाशिर काझी, +9194223 92855,
कणकवली अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,094206 54565,संतोष कानडे 094223 81996,
यांच्याशी संपर्क साधावा आणि चाकरमानी मंडळींनी नावनोंदणी करावी असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा