कासार्डे
तळेरे पंचक्रोशी परिसरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज तळेरे व्यापारी संघाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात तळेरे परिसरातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी तळेरे बाजारपेठ दि.२०सप्टेंबर ते २७सप्टेंबर अशी सलग आठ दिवस बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती तळेरे आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पिसे यांनी दिली. कणकवली शहरासह तळेरे गावातही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित सापडत आहेत. तळेरेतील वाढते कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जनता कर्फ्युची तातडीची गरज होती. कोरोनाची साखळी तोडली तरच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होणार आहे. तळेरे बाजारपेठेत लगतच्या दशक्रोशीतीतील ग्राहकांची खरेदीला नेहमीच ये-जा असते तसेच तळेरे हायवेरील बाजारपेठ असल्याने प्रवासी ग्राहक सुद्धा मोठ्या संख्येने थांबतात, बाजारपेठेत खरेदी करीत असतात. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.
त्यानुसार कणकवली शहराच्या धर्तीवर सर्वानुमते तळेरेत १०० % कडकडीत बंद पाळण्याचा घेण्यात निर्णय आला.दि २० ते २७ सप्टेंबर दरम्यान सर्व दुकाने, सलून, भाजीपालाविक्री, दूधविक्री, मासे, चिकन मटण विक्री राहणार बंद राहणार आहे. तळेरेतील बँकांमध्येही नेहमीच ग्राहकांची मोठी गर्दी असते. बाजारपेठ बंद ठेवून बँका, पतसंस्था उघड्या राहिल्यास उपयोग होणार नाही असाही यावेळी सुर निघाला यासाठी जनता कर्फ्यु दरम्यान बँकांचे कार्यालयीन कामकाज सुरू ठेवून ग्राहकांसाठी बँक बंद ठेवण्याचे करण्यात येणार असून तसे आवाहन त्यांना करण्यात येणार आहे तसेच शहरातील मेडिकल स्टोअर्स बंद ठेवण्याबाबत आज सायंकाळी करणार चर्चा होणार आहे.
रिक्षा आणि टेम्पो संघटना सुद्धा बंदमध्ये सहभागी होणार
या बंदमध्ये रिक्षा आणि टेम्पो संघटनाही सहभागी होणार आहेत.शुक्रवारी तळेरे व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र पिसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीला माजी सरपंच शशांक तळेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोज तळेकर, रिक्षा संघटना अध्यक्ष राजकुमार तळेकर, नाभिक संघटना अध्यक्ष समीर चव्हाण, राजू जठार, विश्वजित तळेकर, अमोल सोरप, प्रवीण वरूणकर, संतोष कल्याणकर, श्री. बिद्रे, बच्चू भांबुरे, भाई डंबे, चंद्रकांत चव्हाण, राजा पाटील, हितेश पाटील, भाई लडगे, पप्या कल्याणकर, अलंकार महाडिक, प्रमोद खटावकर, अप्पा कल्याणकर, आशिष पिसे, प्रकाश जमदाडे, प्रवीण तळेकर, विनोद धुरे, बाबू कल्याणकर आदी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी
उपस्थित होते.