सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 20.75 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3041.3625 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग-47(3005), सावंतवाडी-11(3327.1), वेंगुर्ला-14.(2433.8), कुडाळ-13(2940), मालवण-25(3248), कणकवली-23(3335), देवगड-16(2642), वैभववाडी-17(3400) असा पाऊस झाला आहे.