कुडाळ
कळसुली गावांतील पुनर्वसन भागात १०० हुन अधिक रहिवाश्याना भेडसावणाऱ्या अडी-अडचणी बरीच वर्षे १८ नागरी सुविधा व समस्या वाऱ्यावर होत्या. रस्ता व स्वेच्छा पुनर्वसन मधील नागरिकांची उन्हाळी हंगामात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती. तसेच पुनर्वसन कडे येणारा ३ कि.मी. रस्त्यावर भले मोठे खड्डे पडल्याने एसटी वाहतूक बंद होती. कळसुली देदोनवाडी धरणाचं काम बरेच वर्षे रेंगाळले, बंधाऱ्याचा काही भागावर भगदाड पडली. तसेच धरणाच्या बंधाऱ्यावर वाढलेली झाडे तातडीने तोडा, कळसुली गावातील गडगेवाडी रस्ताची डागडुजी व्हावी, बीएसएनएल टॉवरचे नेटवर्क अचानक गायब होत. याबाबत ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांच्या समोर पुनर्वसन मधील भेडसावणाऱ्या समस्यावर चर्चा केली लवकरच या समस्यांवर तोडगा काढण्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजयजी पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिशजी सावंत, माजी जि. प. सदस्य बाळा भिसे, जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुकाप्रमुख राजू राणे, विभागप्रमुख रुपेश आमडोसकर, जि.प. सदस्य लॉरेन्स मान्येकर, शाखाप्रमुख नंदू परब, चंदू परब, संदेश पटेल, नगरसेवक सुशांत नाईक, सरपंच साक्षी परब, अतुल दळवी, सुशांत दळवी, सूर्यकांत दळवी, मधुकर चव्हाण, नारायण दळवी, सचिन सावंत, ऍड. हर्षद गावडे, हेमंत सावंत, मधुकर चव्हाण, विद्याधर लाड, बाळा खरात, संतोष मुरकर, पुनर्वसन खात्याचे अधिकारी व पदाधिकारी व देदोनवाडी व कळसुली ग्रामस्थ उपस्थित होते.