You are currently viewing अठरा वर्षांखालील मुलांनाही मिळणार मॉलमध्ये प्रवेश; सुधारित नियमावली जाहीर

अठरा वर्षांखालील मुलांनाही मिळणार मॉलमध्ये प्रवेश; सुधारित नियमावली जाहीर

नुकत्याच जाहीर झालेल्या नियमांनुसार, राज्यातील सर्व मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. यासाठी दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. पण १८ वर्षाखालील मुलांसाठी अद्याप लसीकरण सुरु नसल्यानं त्यांना मॉलमध्ये जाण्याबाबत संभ्रम कायम होता. हा संभ्रम आता सरकार दूर केला असून या वयोगटातील मुलांनाही मॉल्समध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

यासंदर्भात आरोग्य विभागानं BreakTheChain नियमावली अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार १८ वर्षांखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे.

मॉल्स आता रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. मात्र, इथे प्रवेशासाठी नागरिकांना तसेच इथे काम करणाऱ्या व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनाही लसीचे दोन डोस घेतलेलं असणं गरजेचं आहे. तसेच दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. तसंच लस प्रमाणपत्र आणि स्वतःचं ओळखपत्रही जवळ बाळगावं लागणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा