You are currently viewing कणकवली पंचायत समिती येथे आवास अभियान ग्रामीण पुरस्कारांचे वितरण

कणकवली पंचायत समिती येथे आवास अभियान ग्रामीण पुरस्कारांचे वितरण

कणकवली

महाराष्ट्र शासन पुरस्कृत आवास अभियान ग्रामीण पुरस्कारांचे वितरण आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यात कणकवली तालुक्यातील फोंडाघाट ग्रामपंचायत ने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार २० नोव्हेंबर २०२० ते ०५ जून २०२१ या कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था तथा व्यक्तींना प्रधानमंत्री आवास अभियान ग्रामीण पुरस्कार वितरण सोहळा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली पंचायत समिती येथील प. पु. भालचंद्र महाराज सभागृहात पार पडला. यात सर्वोत्कृष्ठ क्लस्टर पुरस्कार जिल्हा परिषद मतदार संघ ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सागर सुतार यांना प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांक फोंडाघाट ग्रामपंचायत, द्वितीय क्रमांक हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायत तर तृतीय क्रमांक वागदे ग्रामपंचायत यांना गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट घरकुल प्रथम क्रमांक असलदे येथील सचिन परब द्वितीय क्रमांक हरकूळ खुर्द येथील सुभाष परब, तर तृतीय क्रमांक वागदे गावातील शंकर घाडीगांवकर यांनी पटकाविला त्यांना आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच रमाई आवास योजनेत सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कार जाणवली मतदार संघाचे ग्रामीण गृह अभियंता सागर सुतार यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत मध्ये प्रथम क्रमांक शिवडाव ग्रामपंचायत, द्वितीय क्रमांक फोंडाघाट ग्रामपंचायत, तृतीय क्रमांक पियाळी ग्रामपंचायत यांनी पटकावला तर सर्वोत्कृष्ट घरकुल योजनेत प्रथम क्रमांक तरंदळे गावातील भरत कदम, द्वितीय क्रमांक अनिता जाधव, तृतीय क्रमांक नाटळ येथील संजना तांबे यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, प्रकाश पारकर, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, हर्षदा वाळके, सुजाता हळदिवे, महेश लाड, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय पोळ, संदीप मेस्त्री आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा