तळवडे
आज दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी होत असलेल्या स्थानिक भाजीविक्रेता उपोषण यामध्ये स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत तळवडे यांनी आठवड्यामध्ये बाहेरील भाजी विक्रेता यांना एक दिवस भाजी विक्रीची परवानगी द्यावी व अन्य दिवस गावात किंवा बाजारपेठेत भाजी विक्री करण्यास परवानगी देऊ नये, याबाबत उपोषणास बसले आहेत.
आज तळवडे मध्ये स्थानिक बेरोजगार तरुण भाजी विक्री व्यवसाय करत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापारी वर्ग जिवंत राहावा व तळवडे गावातील स्थानिक नवीन व्यापारीवर्ग बेरोजगार तरुण यांच्या भावी आयुष्य जीवन सुलभ व्हावे यासाठी गावातील ग्रामस्थ एकत्र आले आहेत.
या उपोषणास जालिंदर सहदेव परब, सच्चिदानंद मधुकर बुगडे (उपाध्यक्ष, सावंतवाडी तालुका काँग्रेस), सुरेश जगदीश मांजरेकर (ग्रामपंचायत सदस्य तळवडे), विकास लक्ष्मण गावडे, राजेंद्र अर्जुन परब, महादेव सुभाष गावडे, मयुरेश मुरडेकर, शुभम विठ्ठल परब, रेडकर, मधुकर यशवंत सावंत, शिवराम जाधव, उदय शिरोडकर यांनी पाठिंबा दिला आहे.