कणकवली
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व कणकवली पंचायत समितीच्या डेमो हाऊस या नूतन इमारतीचा शुभारंभ १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. होणार आहे. पं. स. च्या येथील प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते हा शुभारंभ होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजनेंतर्गत काम केलेल्या उत्कृष्ट क्लस्टर, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट घरकूल आलेल्या संस्थांचा व लाभार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभही होणार आहे. जि. प. अध्यक्षा संजना सावंत, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, जि. प. सदस्य संजय देसाई, जिल्हा संचालक राजेंद्र पराडकर आदी उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले आहे.
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टरमधून गृहनिर्माण अभियंता सागर सुतार, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत १. फोंडाघाट, २. हरकुळ बुद्रुक, ३. हरकुळ खुर्द, सर्वोत्कृष्ट घरकूल. १. असलदे (सचिन परब) २. हरकुळ बुद्रुक (सुभाष परब), ३. वागदे (शंकर घाडीगावकर) यांची निवड करण्यात आली आहे.
राज्य पुरस्कृत आवास योजना रमाई आवास अंतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टर ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सागर सुतार, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत १. शिवडाव, २. फोंडाघाट, ३. पियाळी, तर सर्वोत्कृष्ट घरकूल १. तरंदळे-भरत कदम, २. सांगवे अनिता जाधव, ३. नाटळ-संजना तांबे यांची निवड करण्यात आली आहे.