श्रावण म्हयनो सुरू झालो काय उपास, आणि सण सुरू जातत, शुक्रवारची हळदीकुंकू, शनवार, सोमवार उपास, आयतवार सुद्धा पूजतत…
नागपंचमी च्या आदल्या दिवशी बायका, पोरा भावाचो उपास करतत..
आजची नागपंचमी आणि बालपणातली नागपंचमी ह्या डोळ्यासमोर इला काय भूतकाळात जावक होता…
मातीची घरा असायची,
भिंती जास्तसे काव काडून रंगयलेले, नायतर निळो खोक्यातलो कलर,,, ह्यो कलर म्हणजे तेव्हाची शानच म्हनाक होई.
गणपती पुजुच्या भीतीक लागान असणाऱ्या भीतिर, काव लावून चौकोन काढलेलो असायचो, तेचार चुन्याच्या रंगान नागोबाचा चित्र…
बऱ्याच घरात तेचीच पूजा करीत,
नायतर जेंका जमा होता ते,,,
गणपतीच्या शाळेतसून नागोबा आणीत, काय काय शाळेत बीन रंगाचोच देयत, कायजण पिवळो रंग लावन, डोळे काळे करून, तोंडात किशयेची टोका जिभले म्हणून लायत…
आज मात्र नागोबा म्हणजे तेव्हा गणपती सुद्धा अर्ध्या किमतीत येय होतो.
सकाळी नागोबा हाडून,,,
पाटार अळवाच्या पानार ठेवन,
पाटा भोवती रांगोळी काडून तेची पूजा करीत.
अळवाचा पान सुद्धा आदल्यादिवशी काडून हाडीत,,,
नागपंचमी दिवशी जमीन, झाडापेडा दुखवची नसतत,,,
ही बरीच बंधना होती…
आजय त्यादिवशी कामधंदो बंद ठेवन बराच कायमाय शेतकरी, आणि कोकणातले लोक पाळतत, परंपरा जपतत…
जमीन खनुक, झाड तोडुकच काय, तर आमकां पोरांका भायर खेळाक पण बंदी असायची तेव्हा…
उद्देश जमीन दुखवू नये,,,
नायतर नागोबा येयत घरात दुकावलो तर?
नागोबाचा बाजूक एक पानाचो इडो ठेवन, गणेशाची पूजा केली जाता,
वस्त्र, हळद, पिंजर, चंदनाचो गंध लावून बाजूक समय पेटवन नागदेवतेची पूजा करतत…
नागाक प्रसाद म्हणून वाटयेत दूध आणि भाताचे ल्हाये ठेयतत…
(प्रसाद देव खयचोच खायत नाय, पण ती एक श्रद्धा आसता)
आदल्या दिवशीच काडून ठेयलेल्या हळदीच्या पानात तांदळाच्या पिठाचे गूळ चून घातलेले पातोळे डाळ भात दुपारचो निवेद म्हणून दाखयतत…
कोकणात एक असता ता म्हणजे प्रत्येक सण ह्यो भक्तिभावानं पूजलो जाता, साजरो केलो जाता…
संध्याकाळ झाली चार साडेचार वाजले काय नागोबाक घंटा वाजवीत आपल्याच परड्यात नायतर बऱ्या जागेर जय घाणगुन नसता थंय पोचवून विसर्जन करतत…
आम्ही लहान असता पोचयलेलो नागोबा पावसात नाय भिजलो तर हाडून परत घराच्या पाऱयार ठेय होतव….
नागोबाचा नावार पातोळे खावन दोंपारचे आडये होय होतव….