कुडाळ
अनेक दिवस रेंगाळत असलेल्या कुडाळ एसटी स्टँड चे काम हे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळेच झालेले आहे हे तरी त्रिवार सत्य असले, तरी काही लोक मेलेल्या वाघाच्या शरीरावर पाय ठेवून तो वाघ आम्हीच मारला या भूमिकेत वावरत आहेत.
कुडाळ एसटी स्टँड च्या कामाची दुर्दशा तसेच त्यामध्ये रेंगाळलेल्या अनेक कामाचा पाठपुरावा हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने केलेला असून त्याचे श्रेय कोणीही घ्यायचा प्रयत्न करू नये. तात्पुरते नेमलेल्या विभाग नियंत्रक काकडे यांना अर्ज देऊन सदर काम झालेले नसून, संपूर्ण कामाचा पाठपुरावा हा मुंबई सेंट्रल ऑफिस मध्ये जाऊन आम्ही केलेला आहे, व ते खोटे असल्यास कुठल्याही व्यक्तीने त्याची सही निशा करून पहावी. श्रेयः घ्यायची आमची सवय नसून काम झाले पाहिजे हे आमचे धोरण आहे. पण जर का कोणी ते काम आमच्या मुळे झाले आहे असे म्हणत असेल तर ते खेदजनक असल्याचे नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी म्हटले आहे.