मुंबई :
राऊत यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. लोकप्रतिनिधी व मंत्र्यांमध्ये वाढत असलेला करोनाचा संसर्ग ही राज्य सरकारसाठीही चिंतेची बाब बनली आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख यांनाही करोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी करोनावर मात केली आहे.