सिंधुदुर्गनगरी
जिल्हयात रास्तभाव दुकाने,किरकोळ केरोसिन परवाने तसेच ठेवून आजमितीस रद्द असलेली किंवा यापुढे रद्द होणारी, राजिनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची नवीन रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसिन परवाने परवाण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जाहिरनामाव्दारे केले आहे.
रास्त भाव धान्य दुकाने मंजुरीसाठी प्राथम्यक्रम-
पंचायत ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था,नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट,नोंदणीकृत सहकारी संस्था,महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था,महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था.
वरील प्राधान्यक्रमानुसार रास्तभाव दुकाने परवाने मंजूर होणा-या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायांद्वारे करणे आवश्यक राहील.
सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व तालुक्यांतील खालील नमुद गावांसाठी रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने मंजूरीकरीता 10 ऑगस्ट 2021 रोजी एकत्रित जाहिरनामा प्रसिध्द करणेत येत आहे.
कणकवली- तळवडे, सावडाव. कुडाळ- रुमडगाव. देवगड- दाभोळे, पेंढरी, दोडामार्ग- आडाळी, पाटये-पुनर्वसन, आंबडगाव, आंबेली. मालवण- कोथेवाडा, जुवॉपाणखोल, आंबेरी, कुडोपी, चिंदर भटवाडी, वाघवणे, कुणकवळे, मालोंड, बेलाचीवाडी, चुनवरे, खरारे, डिकवल, कुमामे, ओवळीये, खोटले, चांदेर, खाजणवाडी, मांगवणे. सावंतवाडी- शेर्ला, वैभववाडी-निरंक.वेंगुर्ला-निरंक.
सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व तालुक्यांतील खालील नमुद गावांसाठी केवळ रास्तभाव दुकाने परवाने मंजूरीकरीता दि.10-08-2021 रोजी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे.
कणकवली- वारगाव, ओझरम,कुंभवडे, फणसनगर. कुडाळ- कविलगाव, मुणगी, गावराई. देवगड- गढीताम्हाणे, हडपीड, लिंगडाळ, मीठमुंबरी, नाद, पाटगाव, सांडवे, कोर्ले. दोडामार्ग- झोळंबे. मालवण- बांदीवडे ,गोठणे ,आडवली ,कांदळगाव, महान ,मालवण वॉर्ड नं.१. तारकर्ली.वेंगुर्ला- मेढा, वायंगणी, खानोली. वैभववाडी- सांगुळवाडी, वेंगसर, मौदे – आखवणे-गुरववाडी,दिगशी. सावंतवाडी- देवसु , चौकुळ, सावंतवाडी सी वॉर्ड , सावंतवाडी इ १ वॉर्ड , सावंतवाडी इ वॉर्ड , माडखोल , सातार्डा.
सदर जाहिरनाम्यास अनुसरुन वर दर्शविलेल्या प्राथम्यक्रमातील त्या गावातील,क्षेत्रातील पंचायत, बचत गट, सहकारी संस्था यांनी विहीत नमुन्यामधील अर्ज आवश्यक त्या खाली दिलेल्या कागदपत्रांसह दिनांक १० सप्टेंबर २०२१ पर्यंत संबंधित तालुक्याच्या तहसिलदार यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत दाखल करावेत.
अर्जासोबत जोडावयाचे कागदपत्र,अटी व शर्ती
अर्जाचे कोरे नमुने रक्कम रु. १०,तहसिलदार कार्यालयात जमा केल्यावर संबंधित तहसिलदार कार्यालयाच्या पुरवठा शाखेतून उपलब्ध होतील. अर्जदार ज्या गावातील परवान्यासाठी अर्ज सादर करणार आहे त्याच गावातील रहिवासी असावा. विहीत केलेल्या दिनांकापुर्वी प्राप्त झालेल्या अर्जांचाच छाननीसाठी विचार केला जाईल. विहीत तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. यासाठी संबंधित तहसिलदार यांनी अर्जदार यांस पोहोच देऊन अर्जावर दाखल तारीख घालावी. अर्जावर संस्था प्रमुख व संस्थेचे सचिवाची सही असणे आवश्यक आहे.अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे.
अर्जदार जेव्हा ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था असेल तेव्हा –
ग्रामपंचायत,तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था असेल तेव्हा ग्रामसभा,ग्रामपंचायत ठरावाची प्रत. सर्व सदस्यांचे निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत, त्यांचे नावाचे यादीसह. ग्रामपंचायत,तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था यांचे आर्थिक व्यवहार व लेखे अद्ययावत असलेबाबत पुरावा,बॅंकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत.ज्या ठिकाणी परवान्यानुसार दुकान चालविणार आहेत, त्या जागेच्या मालकी हक्काचा पुरावा. यात ग्रामपंचायतीकडील नमुना आठ अ , सातबारा उतारा,नगर भुमापन विभागाकडील मिळकतीचा उतारा तसेच, जागा भाडयाची असल्यास ग्रामपंचायतीचा नमुना आठ अ,सिटी सर्व्हेचा उतारा इ. व रुपये २००, च्या स्टॅम्प पेपरवरील जागा मालकाचे संमत्तीपत्र.
अर्जदार जेव्हा नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था किंवा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था असतील तेव्हा . बचत गट, सहकारी संस्था यातील सर्व सदस्यांची यादी. सहकारी कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झाल्याबाबत जिल्हा उपनिबंधक यांचे प्रमाणपत्र, संस्थेचे आर्थिक व्यवहार व लेखे अद्ययावत असलेबाबत पुरावा. मगिल ३ वर्षांचे ताळेबंद व बॅंकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत.बचत गट,सहकारी संस्था यांच्या सदस्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत सदस्यांचे स्वयंघोषणापत्र. बचत गट,सहकरी संस्थेवर किंवा गटाच्या,संस्थेच्या सदस्य-पदाधिका-यांवर कोणतेही गुन्हे दाखल नसलेबाबत गटाचे,संस्थेचे स्वयंघोषणापत्र. स्वयंसहाय्यता गटाच्या नावे अन्यत्र कोठेही शिधावाटप दुकान कार्यान्वित नसलेबाबत स्वयंघोषणापत्र. प्रस्तावित दुकानाच्या जागेसंबंधी,बांधकामाच्या वैधतेसंबंध,इतर तत्सम बाबींसाठी कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या नियमांचा,केंद्रशासनाच्या कायद्यांचा भंग झाल्यास दुकान विनाविलंब,विनानोटीस रद्द करण्यात येईल ही अट मान्य असल्याबाबत स्वयंघोषणापत्र. परवान्याची जागा निवासी असल्यास संबंधित गृहनिर्माण संस्था अगर तत्सम प्राधिकरणाच्या निवासी जागेतील शिधावाटप दुकान,केरोसिन परवान्यासाठी नाहरकतीबाबत स्वयंघोषणापत्र. ज्या ठिकाणी परवान्यानुसार दुकान चालविणार आहेत, त्या जागेच्या मालकी हक्काचा पुरावा. यात ग्रामपंचायतीकडील नमुना आठ अ , सातबारा उतारा,नगर भुमापन विभागाकडील मिळकतीचा उतारा तसेच, जागा भाडयाची असल्यास ग्रामपंचायतीचा नमुना आठ अ, सिटी सर्व्हेचा उतारा इ. व रुपये २०० च्या स्टॅम्प पेपरवरील जागा मालकाचे संमत्तीपत्र. संबंधित ग्रामपंचायतीचा बचत गटाने/सहकारी संस्थेने परवाना घेण्यास मंजूरीबाबतचा ठराव. स्वयंसहाय्यता गटाकडे,संस्थेकडे खेळते भांडवल असलेबाबत पुरावा.गटाने,सदस्यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले असल्यास, सदर कर्ज हप्ते परत फेडीबाबतच्या सद्यस्थितीचा पुरावा. गटाकडुन,संस्थेकडून सध्या करणेत येत असलेल्या व्यवसायांबाबत माहिती.बचतगट,संस्था रास्त भाव धान्य दुकान परवाना चालविण्यास इच्छुक असलेबाबत बचत गटाच्या सदस्यांचा,सहकारी संस्थेच्या सदस्यांचा ठराव.
अर्जदार जेव्हा महिला स्वसंयहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था असतील तेव्हा —
स्वयंसहाय्यता गट अस्तित्वात व कार्यरत असल्याबाबत संबंधित प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अथवा संबंधित गटविकास अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र. बचत गट, सहकारी संस्था यातील सर्व सदस्यांची यादी व शैक्षणिक पात्रता दर्शविणारा पुरावा. स्वयंसहाय्यता गटाचे सभासद दारिद्यरेषेखालील असल्यास त्याबाबतचा पुरावा.
गटाच्या आर्थिक व्यवहारांचे हिशोब व लेखे अद्ययावत असलेबाबत पुरावा. मगिल ३ वर्षांचे ताळेबंद व बॅंकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत. बचत गट,सहकारी संस्था यांच्या सदस्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी नसल्याबाबत सदस्यांचे स्वयंघोषणापत्र, बचत गट,सहकरी संस्थेवर किंवा गटाच्या,संस्थेच्या सदस्य-पदाधिका-यांवर कोणतेही गुन्हे दाखल
नसलेबाबत गटाचे,संस्थेचे स्वयंघोषणापत्र.स्वयंसहाय्यता गटाच्या नावे अन्यत्र कोठेही शिधावाटप दुकान कार्यान्वित नसलेबाबत स्वयंघोषणापत्र. प्रस्तावित दुकानाच्या जागेसंबंधी,बांधकामाच्या वैधतेसंबंधी,इतर तत्सम बाबींसाठी कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या नियमांचा,केंद्रशासनाच्या कायद्यांचा भंग झाल्यास दुकान विनाविलंब,विनानोटीस रद्द करण्यात येईल ही अट मान्य असल्याबाबत स्वयंघोषणापत्र. परवान्याची जागा निवासी असल्यास संबंधित गृहनिर्माण संस्था अगर तत्सम प्राधिकरणाच्या निवासी जागेतील शिधावाटप दुकान,केरोसिन परवान्यासाठी नाहरकतीबाबत स्वयंघोषणापत्र. ज्या ठिकाणी परवान्यानुसार दुकान चालविणार आहेत, त्या जागेच्या मालकी हक्काचा पुरावा. यात ग्रामपंचायतीकडील नमुना आठ अ, सातबारा उतारा,नगर भुमापन विभागाकडील मिळकतीचाउतारा तसेच, जागा भाडयाची असल्यास ग्रामपंचायतीचा नमुना आठ अ, सिटी सर्व्हेचा उतारा इ. व रुपये २०० च्या स्टॅम्प पेपरवरील जागा मालकाचे संमत्तीपत्र. संबंधित ग्रामपंचायतीचा बचत गटाने,सहकारी संस्थेने परवाना घेण्यास मंजूरीबाबतचा ठराव. सभासदांना वाटप केलेल्या कर्जाच्या तपशिलाबाबत सद्यस्थितीदर्शक पुरावा. स्वयंसहाय्यता गटाकडे खेळते भांडवल असलेबाबत पुरावा. गटाने,सदस्यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले असल्यास, सदर कर्ज हप्ते परत फेडीबाबतच्या सद्यस्थितीचा पुरावा. गटाकडून सध्या करणेत येत असलेल्या व्यवसायांबाबत माहिती. बचतगट रास्त भाव धान्य दुकान,किरकोळ केरोसिन परवाना चालविण्यास इच्छुक असलेबाबत बचत गटाच्या सदस्यांचा ठराव. रास्त भाव धान्य दुकान परवाना मिळाल्यास बचत गट परवाना एकत्रित रित्या चालविणार असुन, अन्य कोणासही परवाना चालविण्यास देणार नसलेबाबत, परवाना हस्तांतरीत करणार नसल्याबाबत गटाच्या सदस्यांचे प्रतिज्ञापत्र. संबंधित ग्रामपंचायतीचा बचत गटाने,सहकारी संस्थेने परवाना घेण्यास मंजूरीबाबतचा ठराव. किरकोळ केरोसिन परवान्यासाठी अर्ज करताना, केरोसिन साठविण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध असलेबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.
सदरचा जाहिरनामाच्या माहितीमध्ये कोणताही बदल झाल्यास जाहिरनामा कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याबाबतचे अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत.अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.