महाराष्ट्र क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष संदेश वरक यांनी दिला आंदोलनाचा इशारा
दोडामार्ग
बांदा -दोडामार्ग रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पावसाळी डांबर आणि दोडामार्ग -विजघर रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी जांभा दगड हा भेदभाव कशासाठी?..जांभ्या दगडाने खड्डे बुजवून सरकार आपली निष्क्रियता दाखवून देत आहे का?असा सवाल राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष (VJNT) तथा महाराष्ट्र क्रांती सेनेचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष संदेश वरक व सामाजिक कार्यकर्ते विष्णू मुंज यांनी केला आहे. जांभ्या दगडाने खड्डे बुजविल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अनेक आंदोलने, उपोषणे करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यतत्पर नसेल तर कशाला हवा असला मदमस्त बांधकाम विभाग?
काही दिवसांपूर्वी आमदार दिपक केसरकर यांनी रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी पावसाळी डांबर वापरण्याच्या सुचना केल्या असताना बांधकाम विभाग जांभ्या दगडाने खड्डे बुजवून आपली मनमानी का करत आहे? कुणाचच ऐकायचं नाही, आज्ञा पाळायचीच नाही असं बहुतेक बांधकाम विभागाने ठरवलेलं आहे का??….
आज दोडामार्ग -विजघर या राज्यमार्गांवरून शेकडो वाहने जातात…ऐन गणेश चतुर्थी च्या तोंडावर वाहन धारकांना खड्डेमय रस्त्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे..रस्त्यातील खड्डे चुकविताना वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे…. अपघात होऊन कुणाचा तरी अंत होण्याची बांधकाम विभाग वाट बघत आहे का?…..सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जांभ्या दगडाने खड्डे बुजविण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत…सध्या पावसाळी दिवसात जर जांभ्या दगडाने खड्डे बुजविले तर रस्त्यावर पूर्णपणे चिखलाच साम्राज्य होऊन अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. अपघात घडल्यास, त्या अपघाताला पूर्णपणे बांधकाम विभाग जबाबदार राहील.
त्यामुळे रस्त्यातील खड्डे पावसाळी डांबरानेच बुजविले गेले पाहिजेत,याचा बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक विचार करावा आणि आमदार केसरकर यांनी दिलेल्या आदेशाचं पालन कराव.अन्यथा बांधकाम विभागाने आंदोलनाला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, कारण आता मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही. असा इशाराही महाराष्ट्र क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदेश वरक व सामाजिक कार्यकर्ते विष्णू मुंज यांनी दिला आहे.