जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांचे प्रयत्न
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला वीस लाख एकावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे दोन जनरेटर साठीचा निधी जिल्हा नियोजन मार्फत प्राप्त झाल्याने जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी आभार मानले आहेत.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये गेली अनेक वर्षे एक जनरेटर जुन्या इमारतीलगत होता तो कित्येक वर्षे बंद स्थितीत असल्याने यासाठी दोन जनरेटर नवीन इमारत व जुनी इमारत त्यामध्ये नवीन इमारतीमध्ये ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग तसेच वरच्या मजल्यावरती शस्त्रक्रिया केलेल्या गरोदर स्त्रिया व इतर रुग्णांना ब्लड बँक असल्याने मध्यंतरी इन्व्हर्टर चा वापर वेगवेगळ्या कक्षांमध्ये चालू होता तसेच जुन्या इमारतीमध्ये सुद्धा गरोदर स्त्रिया व जनरल स्त्रियांचा रुग्णांसाठी कक्ष असून यामध्ये सुद्धा लाईट गेल्यानंतर इन्वर्टर द्वारे लाईट देण्याचे कार्य रुग्णालयाकडून चालू होते.
लाईट अनेक वेळा गेल्यानंतर इन्व्हर्टरची बॅटरी उतरल्यानंतर गर्मीच्या दिवसात फॅन व लाईट नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत होते. त्याचप्रमाणे जुन्या इमारतीलगत शवगृह असल्याने त्यावेळी सुद्धा लाईट गेल्यानंतर निधन झालेल्या व्यक्तींचे शवगृहात शव ठेवणे अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना विद्युत प्रवाह खंडित होत असल्याने त्रास सहन करावा लागत होता.
लाईट गेल्यानंतर निधन झालेल्या व्यक्तींचे शवगृहात अशा व्यक्तींचे शव ठेवल्यानंतर लाईट नसल्याने दुर्गंधी पसरत होती ही बाब जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ओरोस सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग यांना लेखी व फोनद्वारे कळवून त्या दोन जनरेटरचे अंदाजपत्र वीस लाख एकावन्न हजार पाचशे पंचावन्न करून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तसेच जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन यांच्याकरवी जिल्हा नियोजनाच्या मार्फत निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरु होता.
वीस लाख एकावन्न हजार पाचशे पंचावन्न जिल्हा नियोजन विभागामार्फत निधी मंजूर करून सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग ओरोस येथे वरील निधी वर्ग केले असून आता त्या दोन जनरेटरचे टेंडर नियमाप्रमाणे लवकरच काढण्यात येणार असून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना जो त्रास सहन करावा लागत होता तो रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांना आता दिलासा मिळणार आहे.
यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक माननीय डॉक्टर उत्तम पाटील व ओरोस जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व जिल्हा नियोजन मंडळाचे सर्व सदस्य यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला निधी प्राप्त करून दिल्याबद्दल व मोलाचे सहकार्य केल्याबद्दल जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी रुग्णांच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत.