मुंबई :
कोरोना काळात आर्थिक संकटान मुळे हॅकिंग आणि डिजिटल डाटा चोरी होटणाचे प्रणाम वाढताना दिसत आहे.
कोरोना मुळे मोठ्या प्रमाणात डिजीटल ट्रान्झॅक्शन होत आहेत. डिजीटल ट्रान्झॅक्शन वाढण्यासोबतच सायबर हल्ल्याची प्रकरणेही वाढली.
सार्वजनिक क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्वीट करत म्हटले की आता त्यांच्या कोणत्याही एटीएम(ATM)मधून पैसे काढणं अधिक सुरक्षित झाले आहे.
जर तुम्ही एसबीआयच्या एटीएम(SBI ATM) मधून १० हजार अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढत असाल तर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. त्यानंतर तुम्हाला रक्कम काढणे शक्य होणार आहे.
बँकेने आपल्या ग्राहकांना हेही सांगितले की जर तुम्ही एसबीआयच्या कार्डाचा वापर करत आहात तर एसबीआयच्या एटीएममध्ये जाताना तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर घेऊन जा. पैसे काढताना तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी टाकल्यानंतरच तुम्ही १० हजार अथवा त्या पेक्षा अधिक रक्कम काढू शकता.
जर एखाद्या ग्राहकाकडे रजिस्टर्ड मोबाईल नंबर नाही आहे तर तो एसबीआयच्या डेबिट कार्डने एसबीआयच्या एटीएमवरून १० हजारापेक्षा अधिक रक्कम काढू शकत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीला लवकरात लवकर आपला मोबाईल नंबर रजिस्टर्ड करावा लागेल.