You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयसाठी लेटोनिक्स प्रोटोलॉजी लेझर मशिन साठी निधीची गरज

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयसाठी लेटोनिक्स प्रोटोलॉजी लेझर मशिन साठी निधीची गरज

जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन

50-60 Hz लेसोट्रॉनिक्स प्रॉटोलॉजी लेझर मशीन (यंत्र)50-60 Hz lasotronix protology laser machine. छोट्या शस्त्रक्रियेसाठी गोरगरीब रुग्णांच्या गुदद्वारावर मोड तसेच फीशर आल्यानंतर रक्तस्राव होऊन अशा रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यासाठी 13 लाख 50 हजार रुपये किमतीचे हे यंत्र मंजूर करण्याची मागणी जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना दिले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये छोट्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारे यंत्र सुमारे 13 लाख 50 हजार रुपये किमतीचे 50-60 Hz lasotronix protology laser machine लेटोनिक्स प्रोटोलॉजी लेझर मशीन (यंत्र) रुग्णांच्या गुदद्वारावरती मोड व तसेच फीशर झाल्यानंतर रुग्णांच्या गुदद्वारावरती रक्तस्त्राव होऊन अनेक रुग्णांची शस्त्रक्रिया करावी लागतात.

सदरच्या यंत्रामुळे शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांना लवकर आराम मिळून आठ दिवसांमध्ये रुग्ण दैनंदिन आपले काम करू शकतो. याउलट त्या सदरील यंत्राशिवाय शस्त्रक्रिया केल्याने रुग्णांना एक ते दोन महिने बेडरेस्ट घ्यावे लागते यातही रुग्णांना वेदना सहन कराव्या लागतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया खाजगी किंवा शासकीय रुग्णालयामध्ये अशा यंत्रसामुग्रीची सुविधा नसल्याने रुग्णांना गोवा बांबुळी येथे नाईलाजास्तव जावे लागते तसेच ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत नसल्याने तसेच खाजगी रुग्णालयामध्ये गोवा कोल्हापूर किंवा मुंबई येथे रुग्णांना यासाठी 50 ते 60 हजार रुपये शस्त्रक्रियेसाठी खर्च येतो. यामुळे गोरगरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये सदरील शस्त्रक्रिया करावी लागते.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जनरल सर्जन उपलब्ध असल्यामुळे अशा शस्त्रक्रिया होऊ शकतात. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला 13 लाख 50 हजार रुपये किंमतीचे लेझर मशीन (यंत्र)मंजूर करण्याची मागणी मसुरकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा