किती भोगावी शिक्षा क्षुल्लक त्या गुन्ह्यांची,
आयुष्य उगाच गुन्हेगार म्हणूनच जगत आलो.
कर्तव्य पार पाडायची प्रामाणिक माणूस बनून,
तरीही का काढावी रुजलेली मुळे कोपराने खणून,
मुळांना खोदून कपटाने झाडाला मारत आलो,
आयुष्य उगाच गुन्हेगार म्हणूनच जगत आलो.
कोणीही काहीही बोलू दे, भले नावेही ठेऊ घ्यायची
सवय ती आपली उसणा आनंद दाखवून द्यायची,
स्वाभिमान गहाण ठेवल्यासारखा हसत राहिलो,
आयुष्य उगाच गुन्हेगार म्हणूनच जगत आलो.
घेतल्या सर्व जबाबदाऱ्या आपल्याच खांदावर,
तरीही घाव पडतो चुकताच नाजूक हृदयावर,
घावाला हळूवारपणे प्रेमाचे मलम लावत गेलो,
आयुष्य उगाच गुन्हेगार म्हणूनच जगत आलो.
जेवढा जपत गेलो मी माझ्याच वेड्या मनाला,
तेवढाच दूर होत गेलो त्या भावनिक क्षणाला,
भावनेला नसती डोळे म्हणून तसा वागत राहिलो,
आयुष्य उगाच गुन्हेगार म्हणूनच जगत आलो.
किती भोगावी शिक्षा क्षुल्लक त्या गुन्ह्यांची….
(दिपी)✒️
©दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६