अर्धवट राहिलेले एसटी स्टॅन्डच्या कामाचे संपूर्ण खापर हे परिवहन मंत्र्याच्या या धोरणामुळे झालेले आहे. निविदा मागून कॉन्ट्रॅक्टर ला कामे देऊन वेळेवर त्याचा पाठपुरावा न केल्यामुळे कुडाळ एसटी स्टॅन्ड ची शेड अर्धवट राहून प्रवाशांचे संपूर्ण पावसात अतोनात हाल झाले आहेत. संपूर्ण परिसरात चिखला चे साम्राज्य झाले. सदर कॉन्ट्रॅक्टर निविदा स्वतःच्या नावावर घेऊन लोकल फॅब्रिकेटर ला काम दिल्यामुळे या संपूर्ण कामाचा भोज बारा वाजलेला आहे व त्याच्यावर प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नाही. अशा परिस्थितीमध्ये योग्य वेळी काम न झाल्यामुळे सदर कॉन्ट्रॅक्टर वर नियमाने नुकसान भरपाई घेतली गेली पाहिजे. तसेच त्याला ब्लॅक लिस्ट करून भविष्यात कुठलेही काम हे एसटी प्रशासनाने त्याला देऊ नये अशी मागणी लवकरच महाव्यवस्थापककाकडे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना करणार आहे उद्यापर्यंत काम न सुरू झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असून त्याची सर्व जबाबदारी विभाग नियंत्रकावर असणार असल्याची माहिती नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी दिली आहे.