मंगळवारी वेंगुर्ले तालुक्यातून झाला शुभारंभ
वेंगुर्ले
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण गोवा यांच्या CSR निधीतून ” सायकल बॅक ” अंतर्गत मोफत सायकल वितरण कार्यक्रम मंगळवारी मातोंड (ता.वेंगुर्ला) येथील माध्यमिक इंग्लिश स्कूल मध्ये पार पडला. यावेळी दहा विद्यार्थिनींना सायकल वितरण करण्यात आले. दरम्यान, तुळस, रेडी, आडेली, शिरोडा या पाच प्रशालेतील विद्यार्थिनीनाही त्या गावात जाऊन सायकलचे वितरण करण्यात आले.
मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेतर्गत “जनशिक्षण संस्थान सिंधुदूर्ग ” तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभु यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण गोवा यांचे CSR निधीतून “सायकल बॅक” अंतर्गत या योजनेत बसणाऱ्या शाळेमधून निवडण्यात आलेल्या गरीब विद्यार्थिनींना मोफत “सायकल” वाटपचा कार्यक्रम सिंधुदुर्गात होत आहे. मंगळवारी गुरूवर्य वी.स.खांडेकर विदया प्रतिष्ठान शिरोडा संचलित श्री माऊली विदयामंदिर रेडी येथेही हा कार्यक्रम झाला.
यावेळी परिवर्तन केंद्राचे समन्वयक विलास हडकर,भाजप सिंधुदूर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, मानव साधन विकास संस्थेचे उपाध्यक्ष विजय केनवडेकर , भाजप तालुका पदाधिकारी,सदस्य, रेडी जि.प.सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य,लोकप्रतिनिधी, भाजप रेडी पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, कार्यकर्ते, सायकल लाभार्थी चे पालक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग उपस्थित होते.