सावंतवाडी
येथील रुग्णालयाच्या आवारातील ताप चिकित्सालय केंद्रात आजपासून कोरोना स्वॅब सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे. अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य प्रशासनाकडून सावंतवाडी शासकीय विश्रामगृहावर स्वॅब टेस्ट केंद्र सुरू होते. मात्र आजपासून उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब सेंटर सुरू करण्यात आले. सकाळी ९ ते ४ या वेळेत रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे.