You are currently viewing कळंबोली पनवेल तालुका ऑल इंडिया धनगर समाज महासंघ म. रा. कोकण प्रदेशच्या वतीने  महापुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त समाज बांधवांना देण्यात आला मदतीचा हात

कळंबोली पनवेल तालुका ऑल इंडिया धनगर समाज महासंघ म. रा. कोकण प्रदेशच्या वतीने  महापुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त समाज बांधवांना देण्यात आला मदतीचा हात

– 130 कुटुंबापर्यंत पोहोचवली मदत, मदतकार्य करण्यासाठी स्थानिक संघटना व ग्रामस्थांचे लाभले मोलाचे सहकार्य

रायगड

23 जुलै 2021 रोजी झालेल्या ऑनलाइन सभेमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महासचिव नयन सिद यांनी महासंघातर्फे पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महासंघाचे नवनिर्वाचित कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूज च्या माध्यमातून स्थानिक रायगड जिल्ह्यातील जे नुकसान ग्रस्त बांधव आहेत त्यांच्याशी संपर्क साधला जिल्हाध्यक्ष आनंदराव कचरे साहेब, पनवेल तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर, महादेव कारंडे, महाड तालुक्याचे युवक आघाडी अध्यक्ष भाऊ कचरे,  महिला आघाडी अध्यक्षा सुनीता ढेबे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगाडे, शिवाजी हिरवे, महाड येथील झोरे, गणेश शिंदे, यांच्याशी संपर्क साधून रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला होता. काही स्थानिक संघटनांना विश्वासात घेतले.जसे जमेल तसे जसे होईल तसे मदत कार्य आपल्यापर्यंत महासंघातर्फे पोहचवू असा शब्द काळे यांनी पूरग्रस्त समाजबांधवांना दिला होता. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी काकडे यांचादेखील रायगड येथे धावता दौरा झाला होता. रायगड रत्नागिरी असा दौरा नियोजित होता परंतु काकडेच्या जवळच्या नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे साहेबांना पनवेल मधूनच माघारी परतावं लागला त्यामुळे पुढील सर्व दौरे रद्द करण्यात आले होते.


मात्र काकडे, काळे नेहमीच रत्नागिरी व रायगड वाशीयांच्या संपर्कात राहून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत होते. मागच्याच आठवड्यात कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांच्या माध्यमातून काही कुटुंबांना काळे यांनी आपले मित्र अमित जंगम यांच्या माध्यमातून सावंतवाडी विरार प्रवासी संघटनेमार्फत किट पोचविण्याचे कार्य पार पाडले होते. तसेच चार ते पाच दिवसापूर्वी रत्नागिरी येथे देखील नवलराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका अध्यक्ष विष्णू शेळके यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया धनगर समाज महासंघातर्फे खेड, चिपळूण येथे समाज बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्याचा घेतलेल्या आढावा प्रमाणे महाड येथील पन्नास कुटुंबाच्या वस्तीत व आजूबाजूच्या धनगर वाडीवर ही सेवा पुरवण्यासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या रायगड येथील पदाधिकारी महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख महादेव कारंडे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष येळे, रायगड जिल्हाध्यक्ष आनंदराव कचरे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख तुकाराम दादा कोकरे, रायगड जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष (शहर) विश्वजीत नांगरे पाटील, पनवेल तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर, कळंबोली शहराध्यक्ष पैलवान तुकाराम कोळेकर, महिला तालुकाध्यक्ष महाड सुनीताताई ढेबे खालापूर तालुका संपर्कप्रमुख संतोष घाटे, महासंघाचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर धडस या सर्वांनी एकजुटीने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेऊन दिनांक 7 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज विजयसिंह काळे व जिल्हाध्यक्ष आनंदराव कचरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तांदूळ, गहू,इतर राशन,इतर अत्यावश्यक साहित्य किटचे रायगड येथील पूरग्रस्त धनगर वस्ती मध्ये वाटप करण्यात आले. हे सर्व पदाधिकारी काल सकाळी महाड येथील बिरवाडीतील शिवाजी हिरवे यांच्या घरी उतरले व महाड बिरवाडी तून साहित्य वाटपाला सुरुवात केली. खरवली सह्याद्रीवाडी, वरंध, वाकी अशा अनेक धनगर वाड्यामध्ये जाऊन पूरग्रस्तांच्या घराघरात महासंघाच्या पदाधिकारी यांनी 130 पूरग्रस्त कुटुंबीयांना हे साहित्य वाटप केले. हे साहित्य गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाड येथील शिवाजी हिरवे व त्यांचे सहकारी स्थानिक संघटना ग्रामस्थ पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य ऑल इंडिया धनगर समाज महासंघाला लाभले.या सर्व धनगर वस्तीवर शैक्षणिक व सामाजिक विषयवर चर्चा करत समाजाच्या समस्या देखील जाणून घेतल्या, पुढील काळात ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे  व कोकण प्रदेशाध्यक्ष नवल राज काळे  यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यातील समाज बांधवांच्या समस्यांवर ती आवाज उठवण्याचे काम मी रायगड जिल्हा अध्यक्ष व माझे सर्व सोबती आपल्या सर्व स्थानिक संघटनांना समाज बांधवांना एकत्र घेऊन आवाज उठण्याचा प्रयत्न करु व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहु असा शब्द जिल्हाध्यक्ष आनंदराव कचरे व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समाज बांधवांना दिला. पूरग्रस्त धनगर बांधवांनी महासंघाच्या या कार्याचे कौतुक केले आहे व सर्वांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा