You are currently viewing सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसाईक महासंघ च्या माध्यमातून जिल्ह्यातील स्थानिक नवउद्योजक यांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण उपलब्ध होणार

सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसाईक महासंघ च्या माध्यमातून जिल्ह्यातील स्थानिक नवउद्योजक यांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण उपलब्ध होणार

बाबा मोँडकर, अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील नवउद्योजक स्थानिक व व्यापारी बाजारपेठत व्यवसायाच्या माध्यमातुन आत्मनिर्भर होण्यासाठी आवश्यक ट्रेनिंग ची गरज असते जेणेकरून त्या व्यवसायातील पूर्णं माहिती घेऊन आपल्या व्यवसाय वाढऊ शकतो. केंद्र सरकारच्या नँशनल स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास च्या मान्यता प्राप्त १५० पेक्षा जास्त व्यवसायांचे प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ,व्ही. एम. मार्ट फाऊंडेशन, युवा परिवर्तन तसेच मालवण तालुक्यात लायन्स क्लब मालवण च्या माध्यमातून जिल्ह्यातील स्थानिक नवउद्योजक यांना उपलब्ध होणार आहे.

यामध्ये पर्यटन, मेडिकल, अग्रीकल्चर, इलेट्रिक,  ब्युटी अँड वेलनेस, रियल इस्टेट कन्स्ट्रक्शन व सर्विस, जेम व दागिने, आर्ट,आय टी, सेक्यूरिटी, टेलिकॉम, टेक्सटाईल व अन्य शेत्रात व्यवसाय करत असलेल्या व करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांनां शास्त्रशुध्द पध्दतीने प्रत्येक व्यवसायाचे दोन ते तीन दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार असून प्रत्येक व्यवसाईकाला त्यांच्या व्यवसाय उभारणीसाठी तसेच व्यवसायाच्या आवश्यक शासकीय परवानगी साठी पर्यटन महासंघा मार्फत मदत केली जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यांची सुरवात मालवण तालुक्यातून होणार असून बुधवार दिनांक ११/०८/२०२१ रोजी सकाळी १० वाजता दैवज्ञ भवन, मेढा मालवण येथे मालवण तालुका गटशिक्षणआधिकारी श्री.जे. पी .जाधव यांच्या हस्ते जिल्ह्यातील पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे.येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्ह्यात उद्योजकांनां खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ कटिबद्ध असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक,महिला बचत गटांनी तसेच ग्रामपंचायत,नगरपालिका यांनी आपल्या भागातील उद्योजकांनां याचा लाभ द्यावा असे आवाहन, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघा मार्फत करण्यात येत आहे अशी माहिती श्री.बाबा मोंडकर, अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा