कोणी म्हणतं,,,
जपायची असतात ती आपली माणसं,,
जी आयुष्यभर सोबत राहतील..
कोणी म्हणतं,,
जपायचं,, स्वतः बरोबर दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हास्य,,,
जे अश्रूंनाही हसायला लावेल..
कोणी म्हणतं,,,
जपायच्या असतात त्या दुसऱ्याच्या भावना,,
ज्या अंतर्मनाला सुखावून जातात..
कोणी म्हणतं,,
जाणायची असतात ती दुसऱ्यांची खोलवर दडलेली दुःख,,,
जी त्यांचं मन हलकं करतात..
कोणी म्हणतं,,
वाटायचं असतं ते आपल्या झोळीतलं सुख,,,
त्याने झोळी कधी रीती होतंच नाही..
कोणी म्हणतं,,
द्यायचाच असेल तर दुसऱ्याला आनंद द्या,,,
तो उसळत असतो दडून कधी राहत नाही..
कोणी म्हणतं,,
जर पुसायचेच असतील तर दुसऱ्यांचे अश्रू पुसा,,,
ते पुसायला हात कुणाचे मोकळे नसतात..
कोणी म्हणतं,,
जगवायचाच असेल तर एखादा जीव जगवा,,
जो कधीतरी कुणाचातरी आधार बनेल..
कोणी म्हणतं,,
पहायची असतील तर
आशावादी स्वप्न पहा,,,
जी कधीच तुम्हाला स्वस्थ झोपूच देणार नाहीत..
कोणी म्हणतं,,
…………………
✒(दिपी)
दीपक पटेकर