पद्मश्री परशुराम गंगावणे यांची उपस्थिती
कणकवली :
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज, सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविवारी कणकवलीतील आशिये ठाकरवाडी येथील श्रमदानातून साकारण्यात आलेल्या समाज मंदिर इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ठाकर समाजातील ज्येष्ठ लोककलाकार पद्मश्री पुरस्कारप्राप्त पद्यश्री परशुराम विश्राम गंगावणे यांच्या हस्ते करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे निवेदन मनोज गवाणकर यांनी केले.
यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे, सुपुत्र चेतन गंगावणे, सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज अध्यक्ष भगवान रणसिंग, सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सचिव दिलीप मस्के, कणकवली ठाकर समाज अध्यक्ष वैभव ठाकूर, सिंधुदूर्ग जिल्हा ठाकर समाज माजी अध्यक्ष निलेश ठाकूर, माजी पंचायत समिती उपसभापती महेश गुरव, आशिये ग्रामपंचायत सरपंच शारदा गुरव, उपसरपंच संदीप जाधव, आशिये ग्रामसेवक राकेश गोवळकर, इंजिनीयर मिलिंद करंबेळकर, जिल्हा प्रतिनिधी रूपेश गरुड, महापुरुष मित्र मंडळ अध्यक्ष उमेश ठाकूर, आशिये ग्राम सदस्य शर्मिला गवाणकर, आशिये ग्रामपंचायत सदस्य प्रवीण ठाकूर, आशिये ग्रामपंचायत सदस्य समीरा ठाकूर, महापुरुष मित्र मंडळाचे पदाधिकारी, ठाकर समाज शाखा कणकवली ग्रामस्थ उपस्थित होते.
खुपच सुंदर