प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मागणी
देवगड
कोरोना संक्रमण काळात तौक्ते चक्रीवादळ मध्ये नुकसान झालेले काही मच्छिमार सभासद क्वारंटाईन असल्याने त्यांचे नुकसानीचे नुकसानीचे पंचनामे करणे शक्य झाले नाही. त्या काळात कोरोना वाढता संसर्ग असताना अनेक मच्छिमार सभासदांना घरीच रहावे लागले त्यामुळे नुकसान होऊन ही पंचनामे होऊ शकले नाही. या सर्व मच्छिमार सभासदांच्या नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव नुकसानभरपाई साठी शासनाकडे पाठवावेत. अशी मागणी देवगड मधील ३ मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आली. या बाबतचा पत्रव्यवहार सहा. मत्स्यव्यवसाय आयुकत सिंधुदुर्ग यांचेकडे करण्यात आला आहे.
मागील वर्षी कोरोना लॉकडाऊन काळात हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात मासळीला अपेक्षित दर मिळाला नाही. डिझेल भाववाढ, त्यामुळे मच्छिमारी व्यवसाय पूर्ण तोट्यात गेला. त्यामुळे उर्वरित मच्छिमारांचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई मिळावी असेही या पत्रात नमूद केले आहे. या बैठकीला देवगड फिशरमेन्स सोसायटीचे चेअरमन द्विजकांत कोयंडे, व्हाईस चेअरमन सचिन कदम,सहा. सचिव उमेश कदम,तारामुंबरी संस्था अध्यक्ष विनायक प्रभू,व्यस्थापक अरुण तोरस्कर, देवदुर्ग संस्था व्यवस्थापक कृष्णा परब उपस्थित होते.