You are currently viewing कलंबिस्त मळा येथील पूरग्रस्तांना शिवसेनेकडून मदत

कलंबिस्त मळा येथील पूरग्रस्तांना शिवसेनेकडून मदत

सावंतवाडी

पूरस्थिती कलंबिस्त मळा येथील 32 घरांमध्ये पाणी शिरून अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले होते. त्यांच्या घरातील अन्नधान्य कपडालत्ता साहित्य पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. या कुटुंबीयांना मदतीचा हात शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू शिवसेनेच्या वतीने देण्यात आल्या.

तेरेखोल नदीचे पात्र बदलून कलंबिस्त मळा येथील भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. शेती बागायती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागाचे पाहणी आमदार दीपक केसरकर यांनी केली. त्यानंतर शिवसेनेच्यावतीने या भागातील लोकांना मदतीचा हात देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश सावंत, विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, सुरेश शिर्के, जीवन लाड, सुभाष मुळेकर, प्रभाकर राऊळ, दिलीप राऊळ, उपसरपंच रमाकांत राऊळ, दीपक सांगेलकर, सुरेश पास्ते, बाळकृष्ण पास्ते, बाबा पास्ते, शालू रोड्रिक्स, मधुकर राऊळ, मनोज राऊळ आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा