रेस्टॉरंट गुरू इंटरनॅशनल संस्थेचे बेस्ट रेस्टॉरंट, बेस्ट सर्व्हिस, बेस्ट टेक अवे पुरस्कार
हॉटेल इंडस्ट्रीजमधील इंटरनॅशनल ट्रॅव्हल माईत संस्थेने टॉप 3 हॉटेल इन सिंधुदुर्ग आणि टॉप 50 हॉटेल्स वुइथ जिम इन महाराष्ट्र पुरस्काराने केले सन्मानित
कणकवली
रेस्टॉरंट गुरू या इंटरनॅशनल संस्थेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये अग्रगण्य असलेल्या कणकवली येथील थ्री स्टार हॉटेल निलम्स कंट्रीसाईडस या हॉटेलला बेस्ट रेस्टॉरंट, बेस्ट सर्व्हिस आणि बेस्ट टेक अवे असे तीन पुरस्कार जाहीर केले आहेत. नीलम कंट्रीसाईडमध्ये चांगल्या प्रतीचे जेवण, दर्जेदार सुविधा उत्कृष्ठ व्यवस्थापन आणि आरामदाई सेवा पाहून हा अवार्ड देण्यात आला आहे. 2 ऑगस्ट रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
मार्च महिन्यात या हॉटेलला इंटरनॅशनल ट्रॅव्हल माईत या संस्थेने टॉप ३ हॉटेल इन सिंधुदुर्ग व टॉप ५० हॉटेल्स विथ जिम इन महाराष्ट्र हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, अशी माहिती निलम्स कंट्रीसाईडचे व्यवस्थापक प्रसाद कृष्णा यांनी निलम्स कंट्रीसाईड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुभाष दळवी व कमलाकर पाटील उपस्थित होते.