You are currently viewing सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकरांनी प्रभागात राबविली डास निर्मूलन मोहीम.

सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकरांनी प्रभागात राबविली डास निर्मूलन मोहीम.

सुधीर आडीवरेकर एक कार्यक्षम नगरसेवक

नगरपालिका क्षेत्र म्हटलं की नगरसेवकांची जबाबदारी असते ती ज्या प्रभागातून ते निवडून येतात त्या प्रभाग, वाड्यातील स्वच्छता, सुविधा यांकडे जातिनिशी लक्ष देणे आणि नागरिकांना चांगल्या सुविधा पुरविणे. कोणीही लोकप्रतिनिधी कोणाच्या घराची जबाबदारी घेणार नाही परंतु प्रभागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, रोगराई पसरू नये याची काळजी घेण्यासाठी प्रभागात फेरफटका मारून तेथील स्वच्छतेविषयक माहिती घेऊन नगरपालिका स्वच्छता कर्मींकडून साफसफाई, डास निर्मूलनासाठी फवारणी, नालेसफाई, कचरामुक्त वॉर्ड, स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा आदी बाबींची काळजी घेतली पाहिजे.

सावंतवाडीतील अनेक नगरसेवक निवडून आल्यापासून आपल्या प्रभागात गेले देखील नाहीत, त्यांना नागरी सुविधांबाबत काहीही सोयरसुतक नाही, अगदी प्रभागातील पाणंद देखील विसरलेत तिथे सावंतवाडीचे कार्यक्षम नगरसेवक तथा आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर मात्र अपवाद ठरत त्यांनी प्रभागातील डास निर्मूलनासाठी पहिले पाऊल उचलले आहे. सुधीर यांनी प्रभागातील सांडपाणी गटारात वाहते त्याठिकाणी, तसेच वस्तीतील घरांच्या बाथरूम मधून बाहेर पडणारे सांडपाणी, ज्याठिकाणी दलदल, झाडी वाढली आहे तिथे, अगदी टायर पडलेले आहेत अशा सर्वच ठिकाणी कर्मचाऱयांकडून डासांसाठी फवारणी सुरू केली आहे. त्यामुळे आजकाल कोरोना आणि डेंग्यूच्या संकटात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


सावंतवाडीतील दुसऱ्यांच्या जीवावर निवडून आलेले आणि आपण म्हणजे नगरपालिका अशा भावनेने नगरसेवक पद मिरवणारे काही नगरसेवक अगदी पावसाळ्यात अळंबी उगवतात तसेच पाच वर्षांनी निवडणुकीत दिसतात. प्रभागाची जबाबदारी किंवा नगरसेवकांच्या कर्तव्याची त्यांना काहीच जाण नसते. अशावेळी कार्यक्षम नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचे काम मात्र वाखाण्याजोगे आहे. सुधीर यांच्या कार्यातून प्रेरणा घेत सावंतवाडीतील इतर नगरसेवकही जागे होतील अशी अपेक्षा सावंतवाडी वासीयांची आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा