You are currently viewing बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये स्वर्गीय एकनाथ ठाकूर यांची पुण्यतिथी साजरी

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये स्वर्गीय एकनाथ ठाकूर यांची पुण्यतिथी साजरी

कुडाळ :

बुद्धिमत्ता, सचोटी आणि तत्त्वनिष्ठ सामाजिकता याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एकनाथजी ठाकूर. परिस्थिती प्रज्ञावंत माणसाला हरवू शकत नाही. हे स्व उदाहरणातून सिद्ध करणारे महान व्यक्तित्व म्हणजे एकनाथ ठाकूर. मराठी माणसांना नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग या संस्थेमार्फत बँकिंग क्षेत्रात करिअर ची दारे खुली करणारे , सारस्वत बँकेचे संस्थापक -कुशल विश्वासू संचालक म्हणजे एकनाथ ठाकूर .”असे उद्गार प्रा. अरुण मर्गज यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये एकनाथ ठाकूर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये एकनाथजी ठाकूर यांच्या सर्वसमावेशक ,सामाजिक बांधिलकी जपणार्‍या कार्याची उपस्थितांना ओळख करून दिली .तसेच जबर इच्छाशक्ती द्वारे प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते याचे आदर्शभूत उदाहरण घालून देणारे तत्वनिष्ठ चारित्र्यसंपन्न संसदपटू”. अशा शब्दात त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करत ;एका गरीब कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा अनेक मराठी माणसांच्या कुटुंबांचे जीवन समृद्ध करणारे, रोजगाराभिमुख शिक्षण देणारे, त्यांच्या जीवनाला दिशा देणारे ज्ञानपूजक… अशा त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत; त्यांचे जीवन कार्य हे आजच्या तरुणांसाठी कसे आदर्शभूत आहे. याची उपस्थितांना ओळख करून दिली .यावेळी संस्थेच्या जनसंपर्क अधिकारी पियुषा प्रभूतेंडोलकर, बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी चे डॉक्टर सुरज शुक्ला, बॅरिस्टर नाथ पै अध्यापक महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य परेश धावडे नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रा.सौ सुमन करंगळे -सावंत, प्रा. वैशाली ओटवणेकर व त्यांचे सहकारी, बॅ.नाथ पै सेंट्रल (सी बी एस ई)स्कूलचे प्रसाद कानडे ,रोशन राऊळ, प्रणित पालव, अदिती परब, योगेश येरम व त्यांचे सहकारी, बॅ नाथ पै महिला महाविद्यालय व रात्र महाविद्यालयाच्या प्रा.तृप्ती नाईक,प्रा.मनाली मुळीक, आरती नाईक, बॅरिस्टर नाथ पै ज्युनियर कॉलेजचे श्री सातोस्कर,संस्थेतील कर्मचारी प्रसाद परब, पांडुरंग पाटकर, लक्ष्मीकांत हरमलकर, लक्ष्मी करंगळे,प्रज्ञा देसाई, नचिकेत देसाई, यशश्री प्रभुखानोलकर, इतर कर्मचारी उपस्थित होते. संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. परेश धावडे यांनी केले. एकनाथजी ठाकूर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा