You are currently viewing प्रभारी नगराध्यक्ष पदाचा ताबा घेताच चेतन चव्हाण यांच्या कामाचा धडाका सुरू….

प्रभारी नगराध्यक्ष पदाचा ताबा घेताच चेतन चव्हाण यांच्या कामाचा धडाका सुरू….

दोडामार्ग 
नगराध्यक्षा लिना कुबल ह्या 17 ते 21 सप्टेंबर या कालावधीत अनुपलब्ध असल्याने व तसे पत्र त्यांनी मुख्याधिकारी यांना दिल्याने आज प्रभारी नगराध्यक्षांची जबाबदारी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी स्वीकारली, यावेळी आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवताना त्यांनी शहरातील सलून व्यवसायिकांची बैठक घेत त्यांना योग्य सूचना केल्या.
शहरात या अगोदर एक सलून व्यावसायिक पॉझिटिव्ह सापडला असून आपल्या कुटुंबाची जबाबदारी व सुरक्षा आपल्याच हातात असल्याचे यावेळी प्रभारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सलून व्यावसायिकांना सांगितले, तर ग्राहकांना यु एन्ड थ्रो एप्रोन वापरण्यास भाग पाडा, अन्यथा त्या ग्राहकाला सेवा देऊ नका तसेच सॅनिटायझर चा योग्य वापर करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, तसेच सलून व्यावसायिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा