कणकवली :
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रविवारी ८ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता श्रमदानातून साकारण्यात आलेल्या आशिये ठाकरवाडी येथील नूतन समाज मंदिर इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज अध्यक्ष भगवान रणसिंग, कणकवली पंचायत समितीचे उपसभापती महेश गुरव, आशिये सरपंच शारदा गुरव तसेच सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज कणकवली तालुकाध्यक्ष वैभव ठाकूर, महापुरुष ठाकर समाज मित्र मंडळ आशिये अध्यक्ष उमेश ठाकूर यांनी केले आहे.