कणकवली
कणकवली शहरातील नगराध्यक्ष, नगरसेवक, व्यापारी, व इतर सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन दिनांक 20 ते 27 असा कणकवली बंदचा आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
कणकवली शहरा प्रमाणे आधी कलमठ बाजारपेठ बंद व आज वागदे गावातील सर्व व्यवसाय बंद हा निर्णय झाला. याबाबत ग्रामपंचायत कलमठ व वागदे यांचेही जाहीर आभार नगरपंचायत कणकवलीचे नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी मानले आहेत.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न भविष्यात आपणास नक्कीच फायदेशीर होणार यात शंका नाही.
कलमठ गावातील जानवली पुलाच्या पुढील ग्रामपंचायत हद्दीतील व्यापाऱ्यांना देखील शिशिर परुळेकर यांनी विनंती आहे की त्यांनी देखील कलमठ बाजारपेठ बंदच्या धर्तीवर आपले व्यवसाय बंद ठेऊन कणकवली जनता कर्फ्यूला पाठिंबा द्यावा. आज हायवेवर कलमठ हद्दीत अनेक व्यवसाय कॉम्प्लेक्स आहेत, मासे विक्री, भाजी, फळे दुकाने, छोटी हॉटेल, गैरेज गजबजलेले असतात. त्याच प्रमाणे पुढे जानवली ग्रामपंचायत हद्द सुरू होते. तेथे देखिल काही व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत.
कणकवली शहरा प्रमाणे संपूर्ण कलमठ आणि जानवली बंद एकमुखाने झाल्यास जनता बंद खऱ्या अर्थाने पूर्ण होईल, असे मत श्री. परुळेकर यांनी व्यक्त केले आहे या पूर्वी 8 दिवसांपूर्वी श्री.परुळेकर यांनी शहर बंदची विनवणी माध्यमातून सर्वप्रथम केली होती.