You are currently viewing कांदळगाव ग्रामपंचायतीस खुर्च्या भेट

कांदळगाव ग्रामपंचायतीस खुर्च्या भेट

मालवण
कांदळगाव ग्रामपंचायतीस गोपाळ दत्तात्रय कुळकर्णीं यांच्या कडून वीस खुर्च्या भेट देण्यात आल्या. सरपंच सौ. उमदी परब यांच्या जवळ सदर खुर्च्या श्री कुळकर्णी याचे बंधु श्री अजय जोशी यांनी सुपूर्द केल्या. यावेळी माजी सभापती उदय परब, कृषी अधिकारी श्री चुंबळकर, ग्रामसेवक सागर देसाई, उपसरपंच आनंद आयकर, ग्रामपंचायत सदस्या सौ माधवी कदम, सौ अक्षता परब, सौ श्रृतिका कुंभार, मनोज आचरेकर, कर्मचारी आशिष आचरेकर, गजानन सुर्वे अश्विनी लाड, श्री. सावंत, श्री. निमसे, श्री. कांबळी उपस्थित होते.

यावेळी रोटरी क्लब मालवणचे माजी अध्यक्ष श्री अजय जोशी व श्री निमसे व श्री सावंत यांनी या नंतरही आपण ग्रामपंचायतीस मदत करू असे आश्वासन दिले. ग्रामपंचायतीची गरज ओळखून अनेक दाते उपयुक्त साहित्य देण्यासाठी पुढे येत आहेत. अशाच प्रकारे ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास लोक सहभागाने पुष्कळ कामे मार्गी लागतील असा आशावाद सरपंच सौ. उमदी उदय यांनी यावेळी व्यक्त केला. आभार ग्रामसेवक सागर देसाई यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =