तुझी आठवण
आणि आठवणीतील तू..
समान वाटलं तरी,
बराच फरक आहे त्यात.
तुझी आठवण क्षणाक्षणाला,,
डोळे उघडे असो वा मिटले,
तुझी आठवण सतावते मनाला.
तू नजरेसमोर असतेस,
डोळ्यांना दिसतेस..
हास्य खुलता गालावर,
क्षणात लुप्त होतेस.
जसा पानांवर चमकणारा दवबिंदू,
दिसेनासा होतो सूर्याच्या तेजाने.
तुझी आठवण अशीच असते,
जी हृदयाला हेलावून सोडते,
तुझ्या माझ्यातल्या प्रेमाने.
आठवणीतील तू….
भूतकाळ बनतेस,
भविष्यात न येणाऱ्या क्षणांसाठी,
व्याकूळ करून सोडतेस.
आठवणीतील तू..
स्पर्शात जाणवत नाहीस,
एखाद्या तसबिरी सारखी…
हूबेहूब चित्र बनून राहतेस,
केवळ एका आकृती सारखी..
कधीही जिवंत न होणारी.
खरंच,
*तुझी आठवण* सतावताना…
*आठवणीतील तू* मात्र,
निर्विकारपणे हृदयी विसावतेस…
©{दिपी}
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६